Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

मोखाडा कॅम्प

कर्तव्यबोध

पालघर जिल्यातल मोखाडा तालुक्याच गाव या ठिकाणी एका वसतिगृहात सकाळी पोहोचलो, पुढे दिवसभर आजूबाजूच्या पाड्यावर जाऊन लहान मुलांना तपासून त्यांची स्वास्थ्य स्थिती समजावून घ्यायची आणि योग्य तो सल्ला व नोंदी करायचा हा कार्यक्रम डॉ सुजित निलेगावकर सरांनी आखून दिलेला होता त्या साठी आम्ही सगळे आलेलो. त्यामुळे मनात आपण कोणाला तरी मदत करायला चालतोय असा देण्याचा भाव होता अन तो स्वाभाविक असणारच.

गेल्यावर एका वसतिगृहात आम्हा सर्वांची निवासाची व्यवस्था होती, तिथं आमच्या समोर एक व्यक्ती आली, अन मोठ्या भारदस्त आवाजात एक गाणं म्हटलं गेलं त्याचे बोलाही तसेच भारदस्त

“माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सार करायच,

आज ना उद्या मारायचं ” कशाला माग सरायच।।”

त्या व्यक्ती होत्या वर्षा ताई मुळच्या मुंबईच्या, MBA च शिक्षण पूर्ण केलेल, अन गेल्या अनेक वर्षांपासून मोखाड्या मध्ये ‘परिवर्तन’ या संस्थेचा कारभार सांभाळणाऱ्या, वनवासी बांधवाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारी, ही संस्था सर्व विषयात अन सर्वस्पर्शी काम या संस्थेच्या माध्यमातून उभे राहत आहेत स्पेसा कायदा, बचत गट , अन खेळवाडी हा विशेष प्रकल्प तेथील लहान मुलांना बोलत करण्यासाठी अन त्यांच्या अंगात असलेल्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी , ताईंनी या परिसराची सर्वसाधारण माहिती त्यांनी दिली अन आम्हाला पाड्यावर स्थनिक कार्यकर्त्या सोबत म्हणजे दादा लोकांसोबत पाड्यावर पाठवल.

पाडा म्हणजे 50 ते 60 घराचं एक छोटंसं गाव घरांची रचनाही फार सुंदर केलेली कौलारू मातीचे घर घराला वरती काही सामान ठेवण्यासाठी माळ, खाली जमीन शेणाने सारवलेली तशी स्वछता उत्तम घराला लगेच लागून किंवा घरातच जनावरांसाठी राहण्याची व्यवस्था बाहेर बैलगाडी अस साधारण पाड्याची रचना

एका पाड्यावर साधारण 40 ते 50 लहान मूल त्यांची तपासणी करताना लक्षात आलं की त्यांना प्रायः त्वचारोग त्याचे मूलभूत करणे या पड्याच्या रचनेत दिसून येत ते म्हणजे जनावर राहण्याची जागा अन स्वतः राहण्याची जागा यात काहीही अंतर नाही खर तर मनुष्य हा प्राण्यापासून वेगळा नाही हा मोठेपणा केवळ पाड्यावर दिसून येतो पण त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या स्वास्थ्यावर होतोय हे वास्तव आहे.

मुलांमध्ये असेलेल्या अनेक कौशल्य दिसत होते त्यांच्यात असलेली सहनशक्ती ही खरच एक विलक्षण गोष्ट होती त्यांनी म्हटलेली गाणी नृत्य त्यांनी तयार केलेली अनेक प्रकारच्या कलाकृती उत्कृष्ट होत्या, साधनांची उपलब्धता फार कमी असताना देखील या मध्येही ते आपली वाट शोधत असलेलं पाहून समाधान वाटत होतं त्यांच्यातील गुणांचं कौतुक करावे तेवढं कमीच

लहान मुलांची तपासणी संपल्यावर आमच्या जेवणाची व्यवस्था ही एका पाड्यावर लग्नात होती आम्ही सगळे मागे उभे होतो लग्न लागले अन अचानक एक मावशी आल्या त्यांनी शाल आणि मुलींना साड्या चा आहेर केला आम्हाला काही काळ काहीही कळेना आमचा अन त्यांचा काय संबंध, आमची अन त्यांची काहीही ओळख नाही, काहीही नात नाही, त्या मावशी येतात अन आम्हाला काहीतरी देऊन जातात अन जेवणाचा आग्रह करतात, आमचं अन त्यांचं नात सहज निर्माण करतात, हा आमच्या भारतीय सांस्कृतिक वैभवाचा हा भाग आहे हे जाणवत.

आम्ही आलो होतो सेवाभाव घेऊन पण त्या मावशींच्या कृतीने आमच्या मनातील कथित सेवाभावाचा फुगा फुटतो अन त्याच बरोबर वर्षा ताई अन त्यांच्या कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने आमच्या मनातील उगाच निर्माण झालेल्या कष्टचा फुग्याची हवाच निघते अन एक कर्तव्यबोध होतो हा कर्तव्याचा भाव सामाजातील समुत्थानासाठी नेहमीच आग्रही असेल असा आहे

हा कर्तव्यबोध नेहमीच समाजातील कथित मागास म्हणवल्या जाणाऱ्या समाजाने घडवून आणलेलं आमच खऱ्या अर्थाने परिवर्तन आहे आणि हाच समाजाचा सांस्कृतिक भाग आमच्या जीवनातील सांगाती आहे.

Posted in Event