Act and Impact
काही दिवसांपूर्वी सहजच एक दृश्य मी पाहिले , मनाला भिडले, watchman चे काम करणारे वडील आणि त्यांच्या सोबत कामावर जाऊन त्यांचा मोबाइल वापरून अभ्यास करणारा मुलगा आणि बाप लेकांच्या जिंदादिली बद्दल एक पोस्ट लिहिली. निमिशार्धात , त्या पोस्ट वर खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्या. आमचे एक घनिष्ट मित्र , नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी त्या मुलासाठी एक उत्तम टॅब घेऊन देण्यासाठी पैसे पाठवले.
मी तर स्तिमित झालो, हा प्रतिसाद पाहून ! भारतातच ह्या गोष्टी घडू शकतात!
तो मुलगा ज्या झाडाखाली बसला ते कल्पवृक्ष आहे की काय असे वाटून गेले. पण कल्पवृक्ष हे रूपक आहे ,ती इच्छा पूर्ण करतात ते माझ्या ह्या मित्रा सारखे चालते बोलते कल्पवृक्षच! ज्ञानेश्वरांनी पसायदानात वर्णिले आहे ” चला कल्पतरुचे आरव,चेतना चिंतामणीचे गाव…” ह्या प्रमाणे जर प्रत्येक मनुष्य असा कल्पतरू प्रमाणे आचरण करत असेल तर ज्ञानेश्वरांना अपेक्षित समाज उभा राहील आणि त्यांची जी उदात्त अपेक्षा होती “जो जे वांछिल तो ते लाहो !” ती नक्कीच पूर्ण होईल !!!
त्यांनी केलेल्या ह्या मदतीत सत्पात्री,सद्गुणी, गुप्त आणि सत्क्षणी हे जे उच्च दानाचे गुणधर्म सांगितले आहेत ते सर्व च्या सर्व दिसतात !!!!
अनामिक दात्याचे आभार !
माझ्या आणखी एका मित्राने त्यांचा लॅपटॉप देऊ केला त्यातून दुसऱ्या watchman च्या मुलाची गरज भागेल.
पुनःश्च अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे , प्रयत्न आणि कष्ट हेच गुरु!
गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व गुरूंना अभिवंदन!
सांगाती हा फक्त एक दुवा आहे ,गरजवंत आणि दानशूर ह्यांना जोडणारा! आज आमच्या मातोश्रींच्या हस्ते त्याला भेट देण्यात आली. त्याच्या शैक्षणिक प्रवास दैदीप्यमान होवो !!!
देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे
देता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे !
आज urgent basis वर काही dead body pack करण्यासाठी लागणाऱ्या बॅग्स हव्या होत्या माझ्या स्नेह्यांना मी विचारले क्षणाचाही विचार न करता त्यांनी लागणारी आवश्यक रक्कम त्वरित donate केली. सुमारे 25 बॅग्स आज माझे मित्र विशाल कदम आणि शरद ह्यांनी हॉस्पिटल मध्ये सुपूर्त केल्या .
ह्या सर्व घडामोडी केवळ 4 तासात पूर्ण झाल्या.
सरकारी लाल फितीत अडकलेल्या कारभारात त्याआवश्यक गोष्टी सुद्धा वेळेत मिळत नाहीत. त्या वेळी द्रुतगतीने वेळेत केलेली मदत आणि सुहृदनी , सांगाती वर दाखवलेला विश्वास एक नवीन विश्वास देतो कोरोनासारख्या संकटाशी लढण्यासाठी