एरवी तिथल्या लहान सहान घटनेचाही बागुलबुवा करणाऱ्या माध्यमांना आज ह्या आदिवासी बहुल।क्षेत्रात काय सुरू आहे ह्याची कल्पना देखील नसेल।
पहिल्या लाटेत तुरळक कोरोना केस सापडल्या, पण ह्या लाटेत गावोगावी कोरोना पसरला आहे।
लोकांमध्ये सरकारी हॉस्पिटल विषयी भीती आहे, सरकारी यंत्रणा गावात आल्या की लोक रानभरी होतात ( शेतात/ जंगलात जाऊन दडतात)
टेस्टिंग होत नाहीत, oxygen फक्त विक्रमगड ला, oxygen पातळी तपासणी होत नाही,केवळ symptomatic treatment, उपचारांना प्रतिसाद मिळाला तर उत्तम, नाहीतर …….
अशा परिस्थितीत Quick Heal ने दिलेली ambulance clinic ही रुग्णासाठी एक मोठं वरदान ठरली आहे, बऱ्याच रुग्णांना तातडीने हलवणे, गावात जाऊन तापसी करणे ह्यासाठी खूप चांगला वापर होत आहे।
सांगाती आणि परिवर्तन ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण गावोगावी विलगिकरण कक्ष उभे करण्यासाठी पाऊल उचलले।
तुम्ही तातडीने केलेल्या अर्थ सहाय्यतून काही औषधी आणि सुधीर बर्वे ह्यांनी thermometer, pulse oxymeter विकत घेतले आणि काल रविवारी सर्व औषधे मोखाद्यात घेऊन पोहोचलो.
कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
Pulse oxymeter कसा वापरायचा, body temperature कसे मोजायचे, रुग्णाला कधी शिफ्ट करायचे ह्याबद्दल प्रात्यक्षिक झाले.
गावकऱ्यांच्या मानसिकता, कोरोना विषयीचे समज / गैरसमज, प्रचंड भीती, ह्या सर्व बाबींचे आकलन करून प्रत्त्येक गावी लहान विलागीकरण कक्ष सुरू होतील.
- Kantilala / hirave pada – लोकसंख्या – 259
- Janardan badhir – vakharicha. Paada- लोकसंख्या 250
- Bhagvan mavale – bramhan pada – लोकसंख्या -417
- Devram Vaje – dapati – लोकसंख्या-235
- Krushna topale – jambhul matha – लोकसंख्या -500
- chandar Dalvi – nilmati- लोकसंख्या- 613
- sandeep dhondaga- पांगारी लोक संख्या 500
- Antu khutade- ghamodi -लोकसंख्या – 500
- Bhagirath korde – Ase – लोकसंख्या 700
- Vrushali kandale – pasodi pada -लोकसंख्या 240
- Kashinath sankare- bohadi pada -लोकसंख्या- 300
- Chandar gaikwad – Baldyacha paada- लोकसंख्या -300
- anant kharpade – kumbhi pada -लोकसंख्या 250
कोरोना जनजागरण अभियान मोखाडा
” सांगाती”आणि परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून मोखाडा येथे , गेले 2 दिवस मास्क वितरण आणि कोरोना विषयी जागृती अभियान घेण्यात येत आहे .
गावोगावी जाऊन आपले कार्यकर्ते वर्षाताई आणि भास्कर ह्यांच्या सोबत लोकांना मास्क कसे वापरावे , symptoms दिसताच लगेच परीक्षण करावे, isolation करावे ह्या साठी फिरत आहेत
आजारी रुग्णांना आपल्या संस्थेच्या डॉक्टर मार्फत उपचार आणि शासकीय रुग्णलयात पुढील follow up
रुग्णांना तपासण्यासाठी आपली mobile ambulance clinic (donated by quick heal ) आणि वेळप्रसंगी हॉस्पिटलमध्ये सोडण्यासाठी खूप उपयोगात येत आहे ।
नुकतेच एका donor ने उत्तम प्रतीचे wild craft चे 2000 मास्क donate केले , त्यांचे मनःपूर्वक आभार