Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

सांगाती सामाजिक संस्था व कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता केंद्र मार्फत 34 व्या मल्लांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण

काल दिनांक 14 सप्टेंबर 2018 रोजी सांगाती सामाजिक संस्थेच्या अंतर्गत या वर्षातील 34 व्या मल्लाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.

गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगाती संस्थेचे सर्वेसर्वा मा.डॉ.सुजीत निलेगावकर यांनी कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता केंद्राची घोषणा केली.

ध्येय होते जे जे पैलवान कुस्ती खेळताना जखमी होतील व ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा सर्व मल्लांची शस्त्रक्रिया मोफत व काही ठिकाणी अल्प दरात करून त्यांना या जखमी अवस्थेतून बाहेर काढायचे व पुन्हा कुस्ती खेळण्यायोग्य बनवायचे.
डॉक्टर साहेबांच्या या क्रांतिकारी विचारांनी काल बघता बघता 34 मल्लाना या जीवघेण्या वेदनेतून मुक्त केले.
मी नम्रपणे सांगतो याचे सर्व श्रेय डॉक्टर सुजीत निलेगावकर नावाच्या ऋषितुल्य व्यक्तीला जाते.

महाराष्ट्रभरातून यावर्षी 34 पैलवानांची शस्त्रक्रिया काही ठिकाणी बिलुकल मोफत काही वेळी अल्प दरात केली गेली.
सर्व मल्लांची शस्त्रक्रिया कोणत्याही वशिलेबाजी शिवाय त्वरित झाली.
ना कोणती फाईल बनवावी लागली,ना वेटिंग लिस्ट.
केवळ कॉल करणे,रिपोर्ट पाठवणे त्यानंतर कुस्ती-मल्लविद्या महासंघ नेटवर्क द्वारे त्या मल्लाच्या आर्थिक परिस्थितीचे खरोखर पडताळणी होत असे व त्वरित त्याला शस्त्रक्रियेसाठी पाठवले जात असे.
फोन करणारे कोण होते,कोणत्या तालमीत होते,कोण त्याचे वस्ताद हे न पाहता केवळ पैलवान आहे इतकीच ओळख याठिकाणी पुरेशी होती.

काल मुंबईतील कल्याण विभागातील पै.रोशन पवार यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली.अत्यंत गरीब परिस्थितीतून हा मल्ल शालेय स्पर्धेत खेळताना जखमी झाला होता व किमान सहा महिने हे दुखणे अंगावर काढून होता.
त्याने संपर्क करून या योजनेतून शस्त्रक्रिया करून घेतली.

डॉक्टर साहेबांना ज्यावेळी मी रोशन बद्धल बोललो त्यावेळी आमच्या कोशात अगदी एकही रुपया शिल्लक नव्हता.
गेल्या वर्षी 33 शस्त्रक्रिया झाल्या त्यावेळी सुद्धा हीच अवस्था.
वेळोवेळी आवाहन करून सुद्धा यात आर्थिक मदत जमत नव्हती.
मात्र डॉक्टर हसत म्हणायचे की हे गरीब पैलवान जाणार तर कुठे ?
आपण करतोय म्हणून आपल्याजवळ येतात.द्या पाठवून त्यांना…
मनावर ओझे यायचे त्यांचे वाक्य ऐकून पण दुसरीकडे त्या पैलवानांची आर्थिक स्थिती खरोखर वाईट असायची.
प्रत्येक वेळी 30/40 हजार स्वतःच्या खिशातले घालून डॉक्टरांनी हे समाजसेवेचे व्रत आजतागायत जिवंत ठेवले व भविष्यात सुद्धा राहील हे मात्र नक्की.

12 जानेवारी रोजी कुंडल अपघातग्रस्त मल्लांच्या कुटुंबियांना कुस्ती मल्लविद्या व सांगाती अंतर्गत 2 लाख रुपये देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा आपण प्रयत्न केला.

आपल्याला जर मनात कुठेतरी त्यांच्या कार्यात हातभार लावावसा वाटतो तर नक्की काही रक्कम खालील बँक खात्यावर जमा करून आगामी गरजू मल्लावर शस्त्रकीया करण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा.

कुस्ती मल्लविद्या व सांगाती यांच्या या निस्वार्थ व प्रसिद्धीपासून दूर राहिल्या गेलेल्या उपक्रमास आपण जरूर share करून समविचारी लोकांच्यापर्यंत पोचवावे.

Sangati
Bank name : IDBI Bank
Branch name : Ganesh Nagar , Pune
Account type : Saving
Account number : 0588104000123044
IFSC code : IBKL0000588
(सांगाती असा उल्लेख करावा)

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
whatsapp 9850902575
kustimallavidya.org

Posted in Event