Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

आदिवासी समाज उन्नती संघ

आदिवासी समाज उन्नती संघ, या संस्थेचे वसती गृह मोखाडा, ता. मोखाडा, जिल्हा पालघर येथे आहे.

हे फक्त निवासी वसतिगृह आहे.या वसतिगृहात निवास, भोजन, अभ्यास, व त्यांच्या सर्वांगीण विकास याची व्यवस्था आहे.शिक्षण घेण्यास दुसऱ्या शाळेत जातात.

या वसतिगृहात इयत्ता 5 वी ते 10 चे विद्यार्थी प्रेवश घेऊन शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी आदिवासी भागातील गरीब व गरजु विद्यार्थी आहेत.

शासन एका मुलाला एका दिवसाचे भोजनसाठी सकाळी नाष्ता दुपारी जेवन आणि संध्याकाळी जेवन या साठी 30 रुपये देते.त्या मध्ये लाईट बिल,पाणी , व इतर प्रवास ,किरकोल खर्च एवढे करणे शक्य होत नाही.कारण शासन दर महा एका मुलाला 900 रुपये देते.ते ही वेळेवर नाही. त्यात महागाईचा राक्षस वर डोक वर करत आहे.
असे भयाण वास्तव आहे

मग जे काही इमारत दुरुस्ती किंवा इतर खर्च करने तर दुरच.
ह्या वसतिगृहात जेमतेम सुविधा आहेत. मोडक्या इमारती आणि गळक्या कौलारू छतामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात . थंडी जीवघेणी ठरते, तर पावसाळ्यात अहोरात्र छपरातून अभिषेक चालू असतो .
ह्या वसतिगृहाची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे बनले आहे .
माधुकरी योजने मार्फत पुणेकरांनी उदंड प्रतिसाद देऊन ह्या विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न नुकताच सोडवला आहे.

तरी ह्या वसतिगृहाची डागडुजी करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या कडे मदतीचा हात मागत आहे.

आपलाच
डॉ सुजित निलेगावकर
विश्वस्त
सांगाती

Account name :Sangati
Bank name : IDBI Bank
Branch name : Ganesh Nagar , Pune
Account type : Saving
Account number : 0588104000123044
IFSC code : IBKL0000588

टीप
आपली देणगी आयकर विभागाच्या 80 G नियमानुसार करामध्ये सवलतीस पात्र आहे

Posted in Event