Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

Basic Life Support

हार्ट ॲटॅक कधी सांगून येत नाही.
तो कधी ही, कुठे ही, कोणालाही अचानक येवू शकतो. प्रशिक्षित व्यक्तींना हार्ट ॲटॅक आल्याचे सत्वर समजू शकते व त्यावर परिणामकारक उपाय योजना करता येते. हार्ट ॲटॅक ला चुकून ही व कधी ही सहजपणे न घेता मोठ्या गांभीर्याने हाताळावे. केवळ लक्षणे पाहून रुग्णामध्ये हार्ट ॲटॅक असेलच असे कळत नाही. दवाखान्यात जावून ECG केल्यावरच हार्ट ॲटॅक ची निश्चिती होते. हे जितक्या लवकर करू तितके जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरते.

हार्टॲटॅक ला वेळेत ओळखून त्वरित उपाय न झाल्यास हृदय बंद पडते. याला कार्डीॲक ॲरेस्ट म्हणतात. हृदय बंद पडल्यानंतर मेंदू चा रक्त पुरवठा थांबतो व पुढील ३ ते ५ मिनिटात मेंदू मरायला लागतो. ६ ते १० मिनिटा नंतर मेंदू कायमचा मृत होतो. तत्पूर्वी रुग्णाला CPR दिल्यास हार्ट चा पंप चालू राहून मेंदू चा रक्त पुरवठा काही प्रमाणात चालू राहून मेंदू मरत नाही. रुग्णालयात पोहोचेपर्यंत मेंदू जिवंत राहतो व रुग्णालयातील औषध उपचार व विद्युत शॉक नंतर सामान्य पद्धतीने हृदय चालू होवू शकते आणि रुग्ण वाचतो. विशिष्ट पद्धतीने त्वरित छाती दाबणे व श्वास देणे हे केल्यास पुढील अर्धा ते एक तास देखील मेंदू जिवंत राहतो, रुग्णाला रुग्णालयात नेता येते व कोणाचेही प्राण वाचू शकतात.

हार्ट ॲटॅक आलेला असताना काही औषधे देता येतात. या औषधांना वेळेत दिल्यास हार्ट बंद न पडता माणूस वाचण्याची शक्यता वाढते. परंतु काही वेळी दवाखान्यात जाण्यापूर्वी रुग्ण असेल तेथे किंवा वाटेत रुग्ण वाहिके मध्ये हार्ट बंद पडते. अशा वेळी त्वरित CPR सुरू करावा लागतो. सीपीआर देत असतानाच कधी हार्ट मध्ये थरथर ही होत असते. त्याला फिब्रिलेशन असे म्हणतात. हे थांबवण्यासाठी विशिष्ट शॉक दिला जातो. सामान्य व्यक्तीसाठी स्वयंचलित शॉक मशिन वापरले जाते. त्याला एईडी (AED) मशिन असे म्हणतात.
मॉल, जिम, कारखाने, ऑफिस, विमानतळ, विमानात ही AED मशिन असतात. ती वापरल्यास हृदयातील थरथर व विचित्र विद्युत वहन पूर्ण थांबते व हृदयाची नैसर्गिक गती पुन्हा प्राप्त होण्यास मदत होते.

हृदय विकार होण्याची अनेक कारणे आहेत. अचानक हृदय बंद पडण्याची देखील अनेक कारणे असू शकतात. फिट येणे, अर्धांग वायूचा झटका येणे, रक्तातील शर्करा कमी होवून बेशुद्धी येणे, घश्यात काही अडकणे, रक्तस्त्राव, पाण्यात बुडणे, अपघात, आघात, ॲलर्जी, दम लागणे इ.
या अवस्थांमध्ये औषध उपचार न झाल्यास हृदय बंद पडू शकते. या अवस्थेमध्ये कोणते उपचार करायचे ते देखील माहिती असल्यास अत्यायिक अवस्थेतील रुग्ण वाचवण्यासाठी मदत होते.


दि: 14.06.2023
Every person in the society needs to be trained in handling heart attack and other live threatening emergencies.

CPR आणि basic life support हा विषय अत्यंत महत्वाचे आणि एखाद्या रुग्णाचा जीव वाचवणारे कौशल्य आहे.

आज श्री संजयदादा पाचपोर आणि श्री सचिन व्यवहारे ह्यांच्या उपस्थिती मध्ये , आपल्या सांगाती संस्थेच्या basic life support training program च्या सर्व instruments चे पूजन आणि लोकार्पण झाले.
“डॉ मंदार अक्कलकोटकर” हे सांगाती संस्थेच्या basic life support training program चे मुख्य कार्यवाह असतील.

सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगाती मार्फत अशा प्रकारच्या
“Basic life support training” च्या कार्यशाळा घेण्यात येतील.

सांगातीच्या ह्या ” Basic life support training “कार्यशाळा आपण तुमच्या कार्यालये, ऑफिस, शाळा, कॉलेज, सोसायटी, गणेश मंडळ ह्यांच्या साठी arrange करू शकतो.
आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित.


दि: 0६ .06.2023
काल दिनांक ६ जून २०२३ रोजी लेडी रमाबाई हॉल येथे आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२३ च्या निमित्ताने जिज्ञासा पुणे महानगर द्वारे Pre Wari Workshop चे आयोजन करण्यात आले. यामध्ये Introductory, ड्रेसिंग, तसेच आपत्कालीन व व्यवस्थेचे भाग असणारे महत्त्वपूर्ण घटक जसे CPR, resuscitation याचे मार्गदर्शन डॉ मंदार अक्कलकोटकर सर ( First aid and Basic life support project head – Sangati )यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आरोग्य विभागाचे समन्वयक डॉ शशिकांत दुधगावकर,शुभंकर बाचल व जिज्ञासा पुणे महानगर संयोजक रचित गादेकर उपस्थित होते. एकूण ३२० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.


दि: 09.07.2023
सांगाती मार्फत CPR Training abd first aid training workshop.
Excellent response.


दि: 16.07.2023
First aid and CPR training
Successful workshop today at Bhugaon.
Enthusiastic response from residents.
Thanks Sarvesh Kharwadkar for arranging.

Contact Mangesh Padwal +919881562300, for arranging this workshop at your society, school, college, office etc.


दि: 14.01.2024
CPR and first aid training session conducted today bu chief instructor dr mandar akkalkotkar Sir (project head first aid training, Sangati )at Karve Institute.
Enthusiastic participation by girls.
Thank you for support.


दि: 17.01.2024
CPR and first aid training camp organized by Jidnyasa, Dr Mandar Akkalkotkar as chief mentor, around 100 students participated and successfully completed one day workshop.


दि: 27.01.2024
NSS च्या 65 विद्यार्थ्यांसाठी काल निघोज येथे CPR and first aid trainig camp सांगाती मार्फत घेण्यात आला.
उमलत्या वयात “राष्ट्र सर्वतोपरी ” हा ध्यास उराशी बाळगून समाजसेवेचे कणकण करी बांधून कार्यतत्पर असणाऱ्या मुलामुलीं सोबतचा संवाद आणि चर्चा खूपच आशादाई आणि प्रेरक!
गणतंत्र दिनाची सुट्टी सार्थकी लागल्याचे समाधान.


दि: 19.02.2024
शिवजयंती निमित्त CPR training session ” sangati” मार्फत धायरी मध्ये आयोजित केले होते.
त्याला स्थानिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
डॉ मंदार अक्कलकोटकर सरांची जीव ओतून शिकविण्याची पद्धत सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडते. सर्वांचे आभार


दि: 26.04.2024
Free CPR and basic life support training for health care workers under leadership of fr Mandar Akkalkotkar Sir.
27 healthcare workers participated and benefitted from this workshop.


दि: 06.05.2024
First aid and CPR training session for 88 students and 12 teachers by Dr Mandar Akkalkotkar Sir


दि: 11.05.2024
CPR TRAINING & FIRST AID SKILLS
AT – GRANTHRAJ DNYANESHWARI SADHANA KENDRA , UMBARE , PUNE
ORGNISER – SHREE SANT SEVA SANGH
INSTRUCTOR – DR MANDARJI AKKALKOTAKAR
DATE – 11/05/2024