Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

Sports Clinic

IntroductionActivity LeaderActivitiesSuccess Stories

Sports is a neglacted career in india with inadequate funding. Unfortunately funds available for sports are very less, Most of the sportsmen sufffer injuries and because of financial and socio-economic conditions, they are unable to take proper treatment.

Wresting is similar sport which leads tomany injuries . Most of the wrestelers are from poor socio-economic background. We support their treatmetns, give them guidance for medical related problems.

We have Operated 58 Patients.

Dr Shirish Pathak

M.S.(Orth,) DNB (Orth) MNAMS

Fellowship:
  • Arthroscopy & Sports Medicine (ISAKOS Approved) Coimbatore
  • ESSKA Fellowship program – Milan (ITALY)
  • Indian Arthroscopy Society- Gopal Krishnan Fellowship
  • Shoulder and Sports surgery -Konkuk University, Seoul, South Korea
  • Shoulder & Arthroscopy Surgery, Cattolica, Italy
Consultant Sports & Shoulder Surgeon

Department of Sports Medicine
Deenanath Mangeshkar Super Specialty Hospital

Shirish Pathak is a qualified Orthopedic Sports Surgeon, providing specialized care for Shoulder, Knee & Sports injuries, providing specialized care for injuries of Shoulder, Knee and wide range of other sports injuries.
Supervising sports rehabilitation programs for sports persons.
Performs approximately 400 subspecialty Surgeries a year.

Course Director-
  • RCS, London accredited Core Skill Course in Arthroscopy at Deenanath Mangeshkar Hospital. Trained 60 Surgeons
  • Pune Shoulder Course – Annual 2day course
  • Faculty- Postdoctoral Fellowship in Orthopedic Sports Medicine, accredited by National Board of Examination
  • Fellowship Director- Training program in Arthroscopy & Shoulder Surgery for young orthopedic surgeon.

Honorary Sports Physician – NK Badminton Academy, Pune

Team Physician – Radstrong Running Group, Pune

Commonly Done Arthroscopic Surgeries
Knee- ACL, PCL, Meniscus Repair
Shoulder- Bankart, Cuff repair
Elbow- Arthrolysis
Ankle- Ligament Repair
Hip- Labral Repair


Commonly Treated Sports injuries

Tennis Elbow
Shoulder pain
Back pain
Knee pain – IT band syndrome
Heel pain, Ankle sprains

Ready to wrestle again
Another young wrestler got operated for shoulder, supported by Sangati , Thank you Dr Shirish Pathak and Charity Department at Deenanath mangeshkar hospital, Pune.
सांगाती मार्फत सुरू असलेल्या उपक्रमात आणखी एका मल्लाची यशस्वी surgery आज दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी रित्या पूर्ण झाली
डॉ शिरीष पाठक आणि सहकार्यांनी आणखी एका उमद्या मल्लाला त्याचे कुस्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी संधी दिली !
कुस्ती ही केवळ खेळुनच जपली पाहिजे असे नाही तर जखमी खेळाडूंवर योग्य उपचार करून त्यांना परत पुन्हा खेळते करण्याचे काम सुद्धा बहुमोल आहे .
उद्याचे olympic वीर ह्याच तांबड्या मातीतून उगवणार !आपण फक्त बीज पेरणी करत राहायची , एकतरी बीज रुजले ह्याचा आत्मविश्वास आहे आणि तोच ह्या जगन्नाथाचा रथ अविरत ओढण्यास मनोबल देतो
दरम्यानच्या काळात बऱ्याच मल्लांच्या surgeries होऊन गेल्या पण पोस्ट टाकणे जमले नाही,
सांगाती संस्थे च्या मार्फत ह्या आठवड्यात 3 पैलवानांच्या surgeries झाल्या , आणि आणखी 2 operation planned आहेत.
पैलवानांचा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक आहेच, पण तितकाच आर्थिक ताण देणारा आहे.
डॉ शिरीष पाठक ह्यांचे मानावे तितके आभार कमीच, त्यांच्या शिवाय ह्या विषयात इतकी मजल मारणे शक्य न्हवते.
86th Surgery on wrestler from poor family . Thanks Charity department Deenanath Mangeshkar hospital, Dr Shirish Pathak and our donors .
श्री जयेश मिनासे ह्यांच्या आर्थिक सहकार्याने आज , डॉ शिरीष पाठक ह्यांनी ८२व्या मल्लवर खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली ।
वाशीम मधून आलेला हा तरुण होतकरू खेळाडू , ज्याच्या डोळ्यात मोठा कुस्तीगीर होण्याची स्वप्न आणि मनात जिद्द ! दुखापती मुळे कुस्ती सोडायची वेळ आली पण सांगाती मार्फत आशेचा किरण दिसला आणि त्यादिशेने वाटचाल करीत पुण्यात आला , पुण्यात राहायची पण सोय नाही, ओळखीचे नाहीत, खिशात पैसे नाहीत अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये आज त्याची surgery होणे ही समाधानाची बाब आहे ।

खेळाला चांगले वातावरण पाहिजे , आपल्याला olympic medal मिळाले पाहिजे असे आपण नेहेमी म्हणतो , त्यासाठी एक वातावरण निर्मिती झाली पाहिजे . कोणत्याही खेळाडूला योग्य ते उपचार आणि त्याचे rehabilitation हा त्यातील एक भाग !

जयेश मिनासे ह्यांनी आपल्या वडील बंधूंच्या जन्मदिना प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून ,डॉ शिरीष पाठक ह्यांच्या निस्वार्थ वैद्यकीय सेवेतून आणि सामाजिक बांधीलकी म्हणून दीनानाथ च्या चॅरिटी विभागाचे सहकार्य ह्यातून असेच गरजू मल्ल operate होऊन पुन्हा खेळू लागतील खेळ सुरू राहील तसे मेडल च्या आशा जागृत राहतील .

कोरोनाच्या प्रादूर्भावात कुस्ती क्षेत्रही होरपळले गेले . त्यात एखाद्या होतकरू पैलवनाची दुखापत ही त्याच्या करिअर च्या मुळावर उठलेली ! आर्थिक परिस्थिती खराब, त्यात मैदानं बंद आणि पालकांचा रोजगार थांबलेला , ह्या कठीण परिस्थितीत अडकलेल्या 5 मल्लांची surgery , डॉ शिरीष पाठक ह्यांनी नाममात्र मूल्य घेऊन आणि “सांगाती” च्या मदतीने , दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पार पडली .
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल च्या चॅरिटी department आणि डॉ शिरीष पाठक , ह्यांचे मनःपूर्वक आभार!
71 th surgery on wrestler from poor family.
In tough situation like covid pandemic , financial help given by Victaulic company, Hinjawadi, Pune.
Thanks a lot Mr Shashank Songade, Mr Ajit Nilgirkar and Mr Shreedhar for supporting this surgery.
“सांगाती” मार्फत पै.सुशांत रसाळ ची खांद्याची शस्त्रक्रिया यशस्वी*

*70 वी शस्त्रक्रिया पूर्ण*

सांगाती सामाजिक संस्थेद्वारे आज 70 व्या मल्लाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.वेल्हा तालुक्यातील मल्ल पै.सुशांत रसाळ याला कुस्ती खेळताना खांद्याची दुखापत झाली होती.घरची अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने बरेच दिवस सदर दुखणे अंगावर काढले.अतिशय वेदना होऊ लागल्याने व शस्त्रक्रिया करायची परिस्थिती नसल्याने सुशांत ने सांगाती सामाजिक संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुजित निलेगावकर यांच्याशी संपर्क साधून शस्त्रक्रिया करायची विनंती केली व आज त्याची शस्त्रक्रिया झाली व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

*VICTAULIC कंपनीचा आर्थिक मदतीचा हात*

कोरोना वैश्विक महामारी मुळे शासकीय योजना तसेच वैद्यकीय मदतीसाठी आर्थिक निधी जवळपास बंदच आहे.अश्यावेळी जे पैलवान सांगाती कडे येत होते अश्यांचा उपचार करणे अवघड झाले होते.डॉ.सुजित निलेगावकर यांनी अनेकदा ही खंत बोलून दाखवली मात्र आर्थिक निधी उपलब्ध होईना.अश्या विपरीत स्थितीमध्ये VICTAULIC कंपनीचे मा.श्री.शशांक सोंगदे
श्री.अजित नलगिरकर व
श्री.श्रीधर यांनी या पुण्य कार्यासाठी दीड लाख रु.(150000) निधी दिल्यामुळे सुशांत च्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला.कुस्ती क्षेत्रातून शासकीय,निमशासकीय तथा औद्योगिक क्षेत्रात गरुड भरारी मारणाऱ्या माजी मल्लानी आपल्या इतर बांधवांच्या ऑपरेशन साठी निधी दिला पाहिजे असे आवाहन डॉ.सुजित निलेगावकर यांनी केले.

*दीर्घ वेदनेतून माझी मुक्ती झाली – पै.सुशांत रसाळ*

कुस्ती खेळताना झालेल्या खांद्याच्या दुखपतीने मी खूप महिने त्रस्त होतो.कोरोना विषाणू साथीने वैद्यकीय क्षेत्र हादरुन गेले होते आणि मला मार्ग दिसत नव्हता.अश्यावेळी सांगाती संस्थेचे डॉ.सुजित निलेगावकर हे मला देवासारखे भेटले.माझ्या ऑपरेशन चा निधी गोळा करणेपासून मला मानसिक आधार देईपर्यंत सर्वकाही त्यांनी केले.आज माझी शस्त्रक्रिया झाली व माझी वेदनेपासून मुक्ती झाली असे उद्गार सुशांत ने काढले.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.org
Whatsapp 9850902575

Through this program we have successfully conducted expensive surgeries on 18 wrestelers and 4 atheletes were diagnosed and treated.

Guidance and scannings of more than 24 sportsmen was done.

Yet another major surgery . Sangati has been instrumental in getting 39 surgeries done on wrestlers from poor family. Obviously, this would not have been possible without unconditional support from Dr Shirish Pathak and Charity Dept of Deenanath Mangeshkar Hospital, Pune. I thank everyone in team from bottom of my heart.

*सांगाती व कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता केंद्रामार्फत पै.शिवाजी गाढवे याची लिग्यामेंट शस्त्रक्रिया यशस्वी*

एप्रिल 2017 पासून महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल मल्लांसाठी निस्वार्थी भावनेने सुरू केलेल्या “सांगाती सामाजिक संस्थे” अंतर्गत चालणाऱ्या कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता केंद्र अंतर्गत नुकतेच अहमदनगर चा तुफानी मल्ल पै.शिवाजी गाढवे याच्या लिग्यामेंट ची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली.

याकामी सांगाती चे डॉक्टर सुजीत निलेगावकर सरांचे नेहमीप्रमाणे बहुमूल्य योगदान लाभले.

सदर शस्त्रक्रियेबद्धल पै.शिवाजी गाढवे याने सांगाती व कुस्ती-मल्लविद्या चे आभार मानले.

*हे कार्य पुढे यशस्वीरित्या चालण्यासाठी आपली मदत महत्वाची*

हा उपक्रम चालवण्यासाठी डॉक्टर सुजीत निलेगावकर सर व कुस्ती-मल्लविद्या जीवाचे रान करत आहोत.आजवर अनेक मल्लांच्या शस्त्रक्रिया झाल्या मात्र या निधीच्या खात्यावर येणारे आर्थिक तरतूद नगण्य आहे.त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने यथाशक्ती खालील खात्यावर आर्थिक मदत दिली तर आपला पैसा एखाद्या गरीब मल्लच्या उपचारासाठी संजीवनी ठरू शकतो.

*”कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता निधी साठी आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे”*

कुस्ती-मल्लविद्या परीवार महाराष्ट्र राज्य व “सांगाती” सामाजिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 26 मार्च 2017 रोजी पुणे येथे “कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता निधी केंद्र” याची स्थापना करण्यात आली.

जखमा,हात पायांना इजा होणे,सतत काही ना काही लागणे हे सर्व कुस्ती खेळताना होत असते.

आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक पैलवान अनेक जखमा अंगावर निभावून नेतात व कालांतराने ती व्याधी वाढते आणि फार मोठी डोकेदुखी बनते.

एखाद्या पैलवानांचा हात अगर पाय किंवा तत्सम अवयव दुखावला तर त्यांच्या घरच्यांना अनेक ठिकाणी आर्थिक तरतुदीसाठी पदर पसरावे लागतात व वेळेत निधी न मिळाल्याने अनेक वेळा वेळेत उपचार होत नाहीत,प्रसंगी फार मोठी दुखापत,अवयव जायबंदी होणे असेही प्रकार घडतात.

पण,इथून पुढे महाराष्ट्रातील कोणत्याही तालमीचा,कोणत्याही राज्याचा पैलवान आर्थिक परिस्थिती नाही म्हणून दुखापत घेऊन घरी बसणार नाही.

कुस्ती मल्लविद्या व सांगाती सामाजिक संस्था व डॉ.दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती खेळताना जर कोणताही मल्ल जखमी झाला तर त्याचा उपचार मोफत करण्यात येणार.

यासाठी काल “कुस्ती-मल्लविद्या मेळाव्यात” डॉक्टर सुजित निलेगावकर सर यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली.

*आपण यात कसे सामील होऊ शकता ?*

महाराष्ट्र किंवा देशातून जे वाचक आपल्या पैलवान बांधवांसाठी निधी देऊ इच्छितात त्यांनी खालील खाते नम्बर वर निधी पाठवावा.

आपण दिलेला पै न पै कुस्तीमध्ये जखमी होणाऱ्या मल्लांसाठी वापरला जाईल.

सांगाती सामाजिक संस्था व कुस्ती मल्लविद्या परीवार मार्फत देणगीदार व लाभार्थी मल्ल दोहांची माहिती देणगीदार व मल्लाना देण्यात येणार,सदर जमाखर्चाचे शासकीय ऑडिट मान्यताप्रॉत चार्टड अकौंटंट करतील.

*आपला पैसा एखाद्या मल्लाचे आयुष्य वाचवू शकेल.*

एक महिना हॉटेल जेवण,व्यसनाचे पदार्थ,,सिनेमा,करमणूक इत्यादी मध्ये वाया जाणारा पैसा आपण याकामी द्यावी असे मी नम्र आवाहन करतो.

Sangati
Bank name : IDBI Bank
Branch name : Ganesh Nagar , Pune
Account type : Saving
Account number : 0588104000123044
IFSC code : IBKL0000588
(कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता असा उल्लेख करावा)

वरील खाते नम्बर वर येणारा निधी केवळ पैलवानांसाठी वापरण्यात येईल.

तसेच जे पैलवान उपचार घेऊ इच्छितात त्यांनी कुस्ती-मल्लविद्या शी संपर्क करून आपली समस्यां सांगावी किंवा आपले रिपोर्ट kustimallavidya@gmail.com वर अथवा 9850902575 या व्हाट्सअप्प वर मेल करावेत आपल्याला उपचारात कोणतेही अडचण येणार नाही.

डॉक्टर सुजित निलेगावकर सर यांनी सदर उपक्रमाबाबत दिलेली माहिती खालील लिंक द्वारे video मध्ये पाहावी.

https://youtu.be/UgiJc8jL1Ko

सदर पोस्ट जास्तीत जास्त share करून या निस्वार्थी उपक्रमाला गरजू लोकांपर्यंत पोहचवावे.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या

*सांगाती सामाजिक संस्था व कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता केंद्र मार्फत 34 व्या मल्लांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण*

काल दिनांक 14 सप्टेंबर 2018 रोजी सांगाती सामाजिक संस्थेच्या अंतर्गत या वर्षातील 34 व्या मल्लाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.

गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगाती संस्थेचे सर्वेसर्वा मा.डॉ.सुजीत निलेगावकर यांनी कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता केंद्राची घोषणा केली.

ध्येय होते जे जे पैलवान कुस्ती खेळताना जखमी होतील व ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा सर्व मल्लांची शस्त्रक्रिया मोफत व काही ठिकाणी अल्प दरात करून त्यांना या जखमी अवस्थेतून बाहेर काढायचे व पुन्हा कुस्ती खेळण्यायोग्य बनवायचे.
डॉक्टर साहेबांच्या या क्रांतिकारी विचारांनी काल बघता बघता 34 मल्लाना या जीवघेण्या वेदनेतून मुक्त केले.
मी नम्रपणे सांगतो याचे सर्व श्रेय डॉक्टर सुजीत निलेगावकर नावाच्या ऋषितुल्य व्यक्तीला जाते.

महाराष्ट्रभरातून यावर्षी 34 पैलवानांची शस्त्रक्रिया काही ठिकाणी बिलुकल मोफत काही वेळी अल्प दरात केली गेली.
सर्व मल्लांची शस्त्रक्रिया कोणत्याही वशिलेबाजी शिवाय त्वरित झाली.
ना कोणती फाईल बनवावी लागली,ना वेटिंग लिस्ट.
केवळ कॉल करणे,रिपोर्ट पाठवणे त्यानंतर कुस्ती-मल्लविद्या महासंघ नेटवर्क द्वारे त्या मल्लाच्या आर्थिक परिस्थितीचे खरोखर पडताळणी होत असे व त्वरित त्याला शस्त्रक्रियेसाठी पाठवले जात असे.
फोन करणारे कोण होते,कोणत्या तालमीत होते,कोण त्याचे वस्ताद हे न पाहता केवळ पैलवान आहे इतकीच ओळख याठिकाणी पुरेशी होती.

काल मुंबईतील कल्याण विभागातील पै.रोशन पवार यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली.अत्यंत गरीब परिस्थितीतून हा मल्ल शालेय स्पर्धेत खेळताना जखमी झाला होता व किमान सहा महिने हे दुखणे अंगावर काढून होता.
त्याने संपर्क करून या योजनेतून शस्त्रक्रिया करून घेतली.

डॉक्टर साहेबांना ज्यावेळी मी रोशन बद्धल बोललो त्यावेळी आमच्या कोशात अगदी एकही रुपया शिल्लक नव्हता.
गेल्या वर्षी 33 शस्त्रक्रिया झाल्या त्यावेळी सुद्धा हीच अवस्था.
वेळोवेळी आवाहन करून सुद्धा यात आर्थिक मदत जमत नव्हती.
मात्र डॉक्टर हसत म्हणायचे की हे गरीब पैलवान जाणार तर कुठे ?
आपण करतोय म्हणून आपल्याजवळ येतात.द्या पाठवून त्यांना…
मनावर ओझे यायचे त्यांचे वाक्य ऐकून पण दुसरीकडे त्या पैलवानांची आर्थिक स्थिती खरोखर वाईट असायची.
प्रत्येक वेळी 30/40 हजार स्वतःच्या खिशातले घालून डॉक्टरांनी हे समाजसेवेचे व्रत आजतागायत जिवंत ठेवले व भविष्यात सुद्धा राहील हे मात्र नक्की.

12 जानेवारी रोजी कुंडल अपघातग्रस्त मल्लांच्या कुटुंबियांना कुस्ती मल्लविद्या व सांगाती अंतर्गत 2 लाख रुपये देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा आपण प्रयत्न केला.

आपल्याला जर मनात कुठेतरी त्यांच्या कार्यात हातभार लावावसा वाटतो तर नक्की काही रक्कम खालील बँक खात्यावर जमा करून आगामी गरजू मल्लावर शस्त्रकीया करण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा.

कुस्ती मल्लविद्या व सांगाती यांच्या या निस्वार्थ व प्रसिद्धीपासून दूर राहिल्या गेलेल्या उपक्रमास आपण जरूर share करून समविचारी लोकांच्यापर्यंत पोचवावे.

Sangati
Bank name : IDBI Bank
Branch name : Ganesh Nagar , Pune
Account type : Saving
Account number : 0588104000123044
IFSC code : IBKL0000588
(सांगाती असा उल्लेख करावा)

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
whatsapp 9850902575
kustimallavidya.org

Successfully completed 40th surgery of wrestler Lokesh

Thanks a lot Dr Shirish Pathak for whole hearted support

Successfully completed 45 surgeries.

Thanks a lot dr Shirish pathak , administrator Sachin Vyavahare And charity department Deenanath Mangeshkar Hospital, Pune

पै.विशाल पोवार राशिवडे मानाच्या गदेचा मानकरी

सांगाती” सामाजिक संस्थेमार्फत 5 महिन्यांपूर्वी खांद्याची शस्त्रक्रिया केलेल्या मल्लाने आज 60 किलो वजनी मानाची गदा जिंकली.

आज रेठरे बुद्रुक ता.वाळवा जि.सांगली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत पै.विशाल पोवार याने 60 किलो वजनी गटात तुल्यबळ लढती जिंकून मानाची गदा जिंकली. याच मल्लाचे कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान आधार केंद्र मार्फत सांगाती सामाजिक संस्थेद्वारे खांद्याच्या दुखापतीची शस्त्रक्रिया 5 महिन्यांपूर्वी झाली होती. या दुखपतीतून सावरून आज विशाल ने पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्रात भरारी मारली.

कुस्ती मल्लविद्या व सांगाती मार्फत सुरू केलेल्या पैलवनांच्या ऑपरेशन सुविधेमुळे तळागाळातील गरीब व कष्टकरी मुलांना एक नवी संजीवनी मिळत आहे.महागड्या शस्त्रक्रिया करायची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बहुतांशी गरीब मुले कुस्तीपासून दूर राहतात व दुखापत अंगावर निभावून नेत कालांतराने मोठया समस्येला सामोरे जातात व पैसा व वेळ दोन्हीही गमावून बसतात.

मात्र अश्या मल्लांची शस्त्रक्रिया कोणत्याही वशिलेबाजी शिवाय थेट सांगाती सामाजिक संस्थेद्वारे केली जाते.

पै.विशाल पोवार ची अशीच खांद्याची शस्त

Celebrating 50th surgery of injured wrestler !!!

Thanks all my friends for contributing in noble cause.

53rd successful surgery completed on injured wrestler from poor family .
Thanks
Mr Sushil Deshmukh
MD Prasad Sugars
For sponsoring this surgery

सांगाती सामाजिक संस्थेद्वारे 54व्या पैलवानाचे ऑपरेशन यशस्वीपणे पुर्ण

सांगाती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मार्फत आज 54 व्या पैलवानाचे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
पै.नानासाहेब वाघमोडे या पैलवानाची खांद्याची शस्त्रक्रिया डॉ.दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे शल्यविशारद डॉ.शिरीष पाठक यांनी आज केली.

या मल्लाखेरीज अजूनही काही मल्ल ऍडमिट आहेत.

त्यांची सुद्धा या आठवड्यात-पंधरा दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येईल असे सांगाती सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा मा.डॉ.सुजित निलेगावकर यांनी सांगितले.

कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य पैलवान सहायता केंद्र विभागातर्फे गरीब व गरजू मल्लांना सांगाती संस्थेचे डॉ.सुजित निलेगावकर यांच्यामार्फत उपचारासाठी पाठवले जाते.यामध्ये कोण पैलवान कुठला आहे,त्याची तालीम,वस्ताद हे न पाहता हा उपचार करण्यात येतो.

एकीकडे या सुविधेचा वापर करून पुन्हा कुस्ती खेळणारे मल्ल पाहून आनंद होतो तर दुसरीकडे उपचार घेणाऱ्या मल्लांची संख्या वाढत आहे.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
Fb.me/kustimallavidya

53rd successful surgery completed on injured wrestler from poor family .
Thanks
Mr Sushil Deshmukh
MD Prasad Sugars
For sponsoring this surgery

सांगाती सामाजिक संस्थेद्वारे 61वी शस्त्रक्रिया यशस्वी

एका पैलवानासाठी दुसऱ्या पैलवानाची मदत – लखन च्या ऑपरेशन साठी संतोष दोरवड ची आर्थिक मदत

सांगाती सामाजिक संस्थेद्वारे आज पैलवान लखन पांढरे ची लिग्यामेंट शस्त्रक्रिया आज यशस्वीपणे पार पडली.पै.लखन पांढरे हा महाराष्ट्राच्या मैदानी कुस्तीतला एका नामवंत मल्ल.कुस्ती खेळताना गुडघ्याच्या लिग्यांमेंट ला इजा पोहोचल्यामुळे कुस्तीपासून तो दूर होता.

पैलवान संतोष दोरवड ने निभावले मैत्रीचे कर्तव्य

शाहुपुरी तालीम कोल्हापूर चा उप प्रसिद्ध मल्ल तथा चालू सालचा माती विभागाचा उप महाराष्ट्र केसरी पैलवान संतोष दोरवड आणि पैलवान लखन पांढरे हे जिवलग मित्र होय.पडत्या काळात पैलवानच पैलवानांच्या साथीला उभे राहतात हा इतिहास आहे.जगतजेते गामा आणि स्टेनीलास झिबिस्को ची मैत्री सुद्धा अशीच शेवटच्या क्षणाला मदत करणारी होती.संतोष ने मैत्रीचे कर्तव्य म्हणून लखन च्या उपचारासाठी स्वतःचे 25 हजार रु.घातले.इतर पैशांची तरतूद डॉ.सुजित निलेगावकर यांनी करून आज लखन चे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले.

शस्त्रक्रियेसाठी प्रायोजक मिळावेत यासाठी आवाहन

आम्ही कुस्ती मल्लविद्या महासंघ व सांगाती संस्थेद्वारे वर्षभरात किमान 50 शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करत असतो.सदर शस्त्रक्रिया हे पैलवान त्यांच्या इच्छिने किती रक्कम भरतात यावरून मग सांगाती संस्था,धर्मादाय आयुक्त आणि अजून गरज पडली तर प्रसंगी पदरमोड करून ते ऑपरेशन होत असते.आपल्या पैकी कोणी जर यातील एका ऑपरेशन ला 30हजार प्रायोजक रक्कम दिली तर ते ऑपरेशन आपल्या नावाने करू.आपल्या पैशाचा योग्य ठिकाणी वापर होईल.आपल्या पैशाने कोणाचे ऑपरेशन झाले हे सुद्धा कळेल व आमच्या नेटवर्कद्वारे प्रसिद्धी सुद्धा करण्यात येईल.संपूर्ण व्यवहार पारदर्शक करण्यात येईल.तरी प्रायोजक मंडळीनी 9850902575 या वर मला किंवा 9096076446 यावर डॉक्टर साहेबाना सरळ संपर्क करावा.