अविरल मीनाई अभियान
NSS च्या विद्यार्थ्यांचा सहभाग चांगला होता, लवकरच या मुलांच्या माध्यमातून मीना नदिविषयी पथनाट्य सादर करून जनजागृती करण्याचे ठरले आहे, तसेच यातीलच काही मुलांच्या माध्यमातून माती परीक्षण करण्याचेही ठरविले आहे, यासाठीचे प्रशिक्षणाची जबाबदारी KVK चे शास्त्रज्ञ डॉ यादव सर यांनी घेतली आहे.
मीना नदीच्या उगामा पासून ते संगमा पर्यंत चा नदी स्वच्छता जागृती चा प्रवास लवकरच आखण्यात येईल.
विद्यार्थ्यानचा वाढता सहभाग उत्साहवर्धक आहे.
दि: 02.10.2022
Fantastic saturday
वैज्ञानिक मित्र डॉ सतिलाल ह्यांच्या आग्रहस्तव “जलदुर्गा सत्कार” सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.
पाणी आणि पर्यावरण ह्या क्षेत्रात विशेष कर्तृत्व गजावणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रम.
एक एक जलदुर्गा आणि त्यांनी केलेलं काम खरोखरच थक्क करून सोडणारे होते, ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष ही तश्याच तडफदार सीमान्तीनी खोत – 365 पैकी 200 दिवस सतत प्रवास, 72 देशात जाऊन आलेल्या आणि unisco च्या व्यासपीठावरून भारतातील पाण्याचे व इतर प्रश्न समर्थ पणे मांडणाऱ्या, रणरागिणी!
उमाताई असलेकर,संध्याताई,डॉ धनश्री पाटील, स्वप्नाजा मोहिते आणि शालू ताई कोल्हे ह्यांना सन्मानित करण्यात आले.
मीना नदीवर सुरु असलेले कार्य; ह्या सर्व जल दुर्गा, त्यांचे पाण्याच्या आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातील नैपुण्य आणि डॉ सतिलाल ह्यांची वैज्ञानिक दृष्टी आणि शास्त्रशुद्ध संशोधन ह्यांची सांगड घालून एक चांगला सज्जन शक्ती एकत्रिकारणाचा प्रयोग घडत आहे.
अपेक्षा आहे की ह्या स्त्री शक्तीच्या समर्थ्यावर आणि एकत्रित प्रयत्नातून पर्यावरण ऱ्हासाचा महिषासूर वधण्यासाठी एक मोठा लढा सुरु होईल.
दि: 26.08.2022
“नदी की कार्यशाला ”
अविरल निर्मल मीनाई ह्या उपक्रमा अंतर्गत आज नारायणराव येथे किमान 200 गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मीना नदीच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरच्या उपाय योजना ह्यावर चर्चासत्र आयोजित केले।
नुकत्याच केलेल्या मीना नदीच्या पाण्याच्या परिक्षणाचा अहवाल आणि त्याचे आरोग्यवरील परिमाण ह्याचे धक्कादायक निष्कर्ष सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यां समोर मांडले.
दोन्ही गावचे सरपंच आणि पोलीस अधीकारी, समस्त ग्रामस्थ ह्यांनी दिलेल्या मार्गदर्शना बद्दल आभार मानून, संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखविली.
दि: 04.08.2022
“नदी की पाठशाळा”
पावसाळ्यापूर्व केलेल्या तपासण्याच्या result वरून “नदी की कार्यशाळा ” हा action प्लॅन तयार करण्याची बैठक आज पार पडली.
त्या नुसार
-लोक जागरण
– presentation
– स्थानिक डॉक्टरांचा सहभाग
– पावसाळ्यातील पाण्याचे sampling
– गणेशोत्सव मंडळांचा सहभाग
– डॉ डोळे फौंडेशन चा सहभाग
ह्या road map वर पुढील intervention सुरू होईल.
“निर्मल अविरल मीनाई”
अभियान
दि: 17.05.2022
“नदी की पाठशाळा”
ग्रेट भेट !
नदी की पाठशाळा मार्फत काम करत असतांना खूप मोठया वैज्ञानिक, पर्यावरणावर काम करणारे प्रभुती, सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्या भेटी घडत आहेत, त्यातच आज नदी चे अभ्यासक, स्टॉक होम पुरस्काराने सन्मानित श्री राजेंद्रसिंह जी ह्यांच्या भेटीचा योग जुळून आला.
दिव्यत्वाची प्रचिती त्यांच्या वाणीतून, कृतीतून आणि कठीण प्रश्नांना सहजतेत उपाय शोधण्यातून दिसून येते ।
आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील तज्ज्ञांच्या सहकार्याने “मीना” नदीवर जो शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू करतोय त्याबद्दल भाईजींनी मोलाचे मार्गदर्शन केले.
अशा प्रकारे नदीचे आरोग्य आणि मानवी आरोग्य ह्यांची सांगड घालणारी ही पहिलीच स्टडी आहे, आणि त्यातून व्यवस्थित नियोजन, लोक जागरण आणि policy making वर ह्या अभ्यासाचा खूप मोठा प्रभाव असेल असे मत राजेंद्रसिंह ह्यांनी व्यक्त केले.
दीनानाथ मार्फत डॉ सचिन पळनिटकर (gastro enterologist), डॉ परीक्षित प्रयाग(infectious disease specialist) आणि administrator श्री सचिन व्यवहारे उपस्थित होते.
योजक शिरोमणी डॉ सुमंत पांडे ह्यांनी सगळ्या गोष्टी घडवून आणून त्याला एक विशिष्ट गती आणि दिशा देण्यासाठी जे काही यत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार !
तरुण डॉक्टर्स चा उत्स्फूर्त सहभाग आणि फर्ग्युसन कॉलेज च्या मुलांची युवा शक्ती नक्कीच ह्या कामाला यश देऊन जाईल असा विश्वास राजेंद्रसिंह ह्यांनी व्यक्त केला आणि केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या “जल बिरादरी” संस्थे मार्फत आर्थिक मदतही देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ह्या भेटीतून नेमकं काय करायचे ते
समर्थांच्या ह्या ओळीतून अगदी समर्पक पणे व्यक्त होते
जाणत्याचे जाणावे प्रसंग
जाणत्याचे घ्यावे रंग |
जाणत्या चे स्फूर्तीचे तरंग
अभ्यासाव ||
दि: 03.05.2022
“नदी की पाठशाला”
आज मीना नदी स्वच्छता अभियाना अंतर्गत नारायण गाव येथे आज on-site visit देऊन, जिथे जास्त प्रदूषण आहे तेथील नदीच्या दूषित पाण्याचे samples घेतले.
त्यावर विविध tests करून नदीचे health card बनवून त्याचा संबंध मानवी आरोग्याशी कसा आहे हे दाखवण्यासाठी real time survey घेतला जाईल.
अशा प्रकारचे व्यापक अध्ययन करून योग्य उपाययोजना करून नदीचे प्रदूषण कमी करण्याच्या कामास अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात झाली.
डॉ मोघे सर ( निवृत्त NCL scientist) व अनिल तात्या मेहेर ( KVK नारायणराव) ह्यांचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टी मोलाचे ठरले
डॉ डोळे आणि नारायणरावचे सरपंच श्री बापू पाटे ह्यांनी स्थानिक डॉक्टर व कार्यकर्त्या ची फळी उभी करून देण्याचे आश्वासन दिले.
13 मे रोजी आणखी 4 ठिकाणी दूषित पाण्याचे आणि नदी पात्राजवळील विहिरीच्या samples घेऊन, surface water contamination levels काढल्या जातील.
अशा प्रकारे नदीचे अध्ययन , पात्राची शुद्धता आणि त्याद्वारे मानवी आरोग्यावर दूषित पाण्याचे दुष्परिणाम टाळण्याचे प्रयत्न करणे
ही ऍक्टिव्हिटी प्रत्येक नदीवर , प्रत्येक गावात करणे काळाची गरज ठरणार आहे आणि त्यासाठी हा प्रोजेक्ट एक milestone ठरेल अशी अपेक्षा