धारकरी अक्षय शिंदे ह्यांचे मनःपूर्वक आभार !
डॉ सुजित निलेगावकर
सांगाती
Register Donor – https://bd.supanth.org/blood-donation/register
Register Patient – https://bd.supanth.org/blood-donation/register-patient
सांगाती च्या सुपंथ वेबपोर्टल माध्यमातून दररोज किमान एक तरी plasma donation चे काम होत आहे, रोज फोटो किंवा माहिती मिळेलच असे नाही, परंतु ज्या मित्रांनी आपल्या शब्दा खातर plasma donation च्या विनंती ला मान देऊन आपले कर्तव्य निभावले त्यांचे आभार मानने हे खूप आनंदाचे काम आहे. आमचे स्नेही संघ स्वयंसेवक श्री सुधीरजी पांडे ह्यांनी आज plasma दानाचे बहुमूल्य योगदान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानने त्यांनाही पटणार नाही! स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन असे कित्येक जण आपला सहभाग नोंदवत आहेत. आपणही आपल्या परिचित रुग्णांना ह्या मोहिमेत सहभागी करून घ्या .
आपलाच
डॉ सुजित निलेगावकर
सांगाती
www.sangatipune.com
Plasma donation नोंदणी साठी
Register Donor – https://bd.supanth.org/blood-donation/register
Register Patient – https://bd.supanth.org/blood-donation/register-patient
कोरोना काळात रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचा मोठा प्रश्न झाल्याने , नेहेमीचे उपचार घेणे पण कठीण झाले आहे, ह्यातच ही एक burn case उपचारासाठी पैसे नसल्याने ,जखम चिघळत होती म्हणून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी आली. मासिक किमान खर्च उपचारासाठी सुद्धा करू शकत नाही अशी परिस्थिती!
ह्यांचा burn साठी दरमहा उपचाराचा खर्च सांगाती मार्फत दिला जाईल.त्यातील sept महिन्याची औषधे देण्यात आली.
“मो सहाय्” ह्या उपक्रमा अंतर्गत आपण कामगारांचा “कोविड कवच” विमा उतरवून त्यांना एक सुरक्षततेची भावना आणि विश्वास उत्पन्न करून देत आहोत. त्या साठी निवडलेल्या 40 कामगारा पैकी 10 जणांचा विम्याचा पहिला हप्ता आज देऊन त्याच्या “कोविड कवच” पोलिसी चे documents त्यांना देण्यात आले.
हे शक्य झाले ते केवळ ह्या उपक्रमास मदत करणाऱ्या आणि सांगाती च्या आवाहनाला वेळोवेळी प्रतिसाद देणाऱ्या तुम्हा दात्यांमुळे! आज ह्या बिकट परिस्थिती तळहातावर जीव घेऊन 40 जण कामाला लागतील, 40 परिवार आपल्या मार्फत दोन घास मिळवण्यासाठी समर्थ होतील !
सर्वांचे आभार !
श्री बीजय साहू आणि प्रशांत देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या “मो सहाय्य” ह्या उपक्रमात सांगाती महाराष्ट्र मिशन लीडर म्हणून सहभागी आहे, त्या अंतर्गत दररोज किमान 30 ते 40 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
*पै.सौरभ गावडे यांचे O+ प्लाझ्मा दान*
*पै.सौरभ गावडे यांच्या प्लाझ्मा दान मुळे वाचले दोन रुग्णांचे प्राण*
सांगाती सामाजिक संस्थेचे मा.श्री.सुजित निलेगावकर व सहकारी यांनी कोव्हीड 19 रुग्णांच्या उपचारासाठी रक्तातील प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले त्याला समाजातून सकारात्मक प्रतिसाद सुद्धा येत आहे.
आज दोन व्यक्तींच्या उपचारासाठी प्लाझ्मा लागणार असल्याची माहिती अँड.कुणाल तापकीर यांना मिळाली व त्यांनी पै.सौरभ गावडे यांच्याशी संपर्क केला.पै.सौरभ हा आगाशे कॉलेज पुणे येथे क्रीडा शिक्षक आहेत. त्यांनी अँड.तापकीर यांच्या विनंतीला होकार देत आज प्लाझ्मा दान केले ज्यांच्यामुळे दोन रुग्णांच्यावर उपचार करणे सोपे झाले.
सदर उपचारासाठी O positive plasma लागणार म्हणून adv तापकीर ह्यांनी संपर्क केला।
पै गावडे ह्यांनी सांगाती च्या plasma donor प्लॅटफॉर्म वर संभाव्य plasma donor म्हणून नोंद केली होती,
Adv तापकीर ह्यांच्या कडे असणाऱ्या गरजू रुग्णांना पै.सौरभ गावडे ह्यांनी दिलेल्या plasma मुळे उपचार करणे सोपे झाले.
पै.सौरभ गावडे यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन.
जास्तीत जास्त कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी सांगाती च्या पोर्टल वर नोंद करावी ही नम्र विनंती.
Register Donor – https://bd.supanth.org/blood-donation/register
Register Patient – https://bd.supanth.org/blood-donation/register-patient
“बहार” बेनके आऊ मै तुम्हारी दुनिया में ।
लहू जिगर का दूगा हंसी लबो की लाली को ।।
ह्या गीताच्या पंक्ती थोड्या बदलल्या आणि तर लहू च्या ऐवजी plasma donate करून , काही कोरोना रुग्णांच्या , ओठांवर कोरोना मुक्तीची लालीम पसरवण्यात ” डॉ बहार कुलकर्णी ” ह्यांनी पुढाकार घेतला.
सांगाती च्या plasma donation च्या आवाहनाला पहिला प्रतिसाद दिला तो डॉ बहार कुलकर्णी सरांनी !
आणि त्यांनी जनकल्याण रक्त पेढी मध्ये डॉ अतुल कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली plasma दान करून दोन रुग्णांना जीवन दान दिले.
डॉ बहार कुलकर्णी हे स्वतः निष्णात सर्जन असून कोरोना मुक्त झाल्यावर त्यांनी पूर्ववत काम सुरू केले आहे.
“जन सेवे साठी काया झिजवावी
Plasma देऊनिया रुग्ण वाचवावी”
हे नवे ब्रीद त्यांनी आपल्या आचरणातून लोकांसमोर घालून दिले.
त्यांनी स्वतः डॉक्टर असुन plasma donation साठी पुढाकार घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे।
माझी अपेक्षा आहे की ह्यातून बरेच जण प्रेरित होतील आणि त्यांच्या मनातील शंका कुशंका दूर होऊन जास्तीत जास्त लोक plamsa donation च्या चळवळीत सामील होऊन, हा उपक्रम यशस्वी करतील.
आपणही ह्या उपक्रमात आपल्या परिचित रुग्णांना जोडून घेऊन, plasma donation साठी प्रेरित करून सहकार्य करा
आपलाच
डॉ सुजित निलेगावकर
सांगाती , पुणे
Register Donor – https://bd.supanth.org/blood-donation/register
Register Patient – https://bd.supanth.org/blood-donation/register-patient