दि: 24.12.2022
Mokhada garment unit Employment generation for tribal women
दि: 06.01.2022
निलेश हा मोखाड्यातून पुण्यात उरात एक स्वप्न घेऊन आला, त्याची इच्छा आहे एक NSG commando होण्याची ! मागच्या मोखाडा visit मध्ये त्याची गाठ पडली,आणि तो आपल्या स्वप्नांच्या शोधात पुण्यात आला . त्याला सुपूर्द केलं आहे ते श्री संदीप टेंगले सरांच्या पोलीस, आर्मी भरती केंद्रात !अपेक्षा आहे की तो एक उत्तम सैन्याधिकारी म्हणून सिलेक्ट होईल . सांगाती मार्फत “हुतात्मा शशी नायर स्मरणार्थ” दर वर्षी एका मुलाला आर्मी training साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आपला मनोदय आहे, आणि निलेश हा पहिला लाभार्थी ! त्याला खूप खूप शुभेच्छा.
दि: 04.12.2021
प्रणव तीर्थ संस्थे मार्फत आज मोखाडा येथे 10 computer units देण्यात आली .
पहिली ते दहावी पर्यंत चा शालेय अभ्यासक्रम अतिशय सोप्या पद्धतीत digitalize करून कार्टून्स च्या माध्यमातून सुलभीकरण केलेलं आहे
Tribal area मधील मुलांना सहज समजू शकेल अशी भाषा ! Interesting cartoons !!
हसत खेळत शिक्षण!
प्रणव तीर्थचे सर्व ट्रस्टी, श्री लगड, श्री महाजन, सौ नीता गांधी ह्यांचे मनःपूर्वक आभार.
दि: 28.02.2021
Quick heal मार्फत donate केलेल्या mobile ambulance clinic चे लोकार्पण श्री भिडे गुरुजी ह्यांच्या शुभ हस्ते झाल्या नंतर, आज प्रथमच तिचा वापर सुरू केला। मोखाड्यातील दुर्गम घानवळ गावात आज 52 रुग्णाची तपासणी आणि औषध वितरण केले. दर आठवड्याला ही रुग्णवाहिका mobile clinic unit वेगवेगळ्या पाड्यांवर मेडिकल सुविधा पुरवत जाईल।
वर्षाताई परचुरे ह्यांचे मार्गदर्शन आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या यशाचे गमक ठरणार !है कार्यक्रमासाठी विशेष वेळ काढून खास पुण्याहून आलेले आमचे मित्र श्री सचिन भापकर आणि श्री मुकुंद masal ह्यांचे देखील आभार!
दि: 18.07.2023
हाताला काम आणि कामाला हात
Stitching unit in full swing!!!
आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल.
धन्यवाद
Mokhada flundation
A project run by
Sangati and Parivartan Mahila Sanstha.
कोरोनाकाळ हा सर्वात जास्त बंधनकारक ठरला तो चिमुकल्यांना
शाळा नाही, खेळगडी नाहीत, बागेत फिरणं नाही की सैर सपाटा नाही!
शहरातील मुलांना तरी online education आणि विविध classes सुरू असतात,
आदिवासी पाड्यातील मुलांच्या शाळेचं काय?
ना शाळा ना online शिक्षण!
परिवर्तन सोबत आम्ही गेली 6 वर्षे “बाल जत्रा ” हा उपक्रम राबवत आहोत , ह्या वर्षीही कमी प्रमाणात का होईना पण बालजत्रेच आयोजन केलं आहे, दर वर्षी 1800 मुलांच्या किलबिलाटाने गजबाजणारी बाल जत्रा , ह्या वर्षी कोरोनाच्या नियमानुसार किमान संख्येत सुरू आहे.
क्राफ्ट, आर्ट, चित्रकला, रंगकाम, गाणी आणि खेळत खेळत थोडासा अभ्यास आणि शेवटी खाऊ! असा हा भरगच्च कार्यक्रम वर्षाताईंच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे, ह्या वर्षी 1200 मुलांच्या उपस्थिती मध्ये, सर्व नियमांचे पालन करून, बालजत्रा उत्साहात पार पडली
पुढल्या वर्षी “बाल जत्रा” खूप मोठया प्रमाणात करण्याची उमेद आहे आणि तुम्हा सर्वांना ह्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी मी आग्रहाचं निमंत्रण देतो
या मोखाड्याला, रमूया बाल जत्रेत
आज सांगाती च्या mobile ambulance clinic चे पूजन आणि लोकार्पण पूज्य भिडे गुरुजी ह्यांच्या शुभ हस्ते सांगली येथे झाले, ह्या ambulance साठी संपूर्ण निधी Quick Heal कंपनीचे सर्वे सर्वा श्री व सौ शैलेश काटकर ह्यांनी donate केला . ह्या ambulance clinic चा वापर मोखाडा परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य तपासणी साठी होईल.
Features
- Full AC
- Small fridge for medicines
- Storage for medicines
- Fans , lights and basin
- Inverter
- One bed and waiting chairs
- Canopy out side for shade
- Mike and loud speakers for announcement.
It will be working in tribal belt of Mokhada, palghar district for service
Thank you Quick heal for donations.
Praying for “quick heal”for all ailments of tribals
मोखाद्यातील आदिवासी पुनरुत्थान समितीच्या हॉस्टेलची दुरवस्था पाहून त्याचे नूतनीकरण करण्याचा संकल्प केला होता, तुमच्या सारख्या अनेक दानशूर लोकांनी आपला निधी देऊन सहाय्य केले. Gawdewadi तालुका आंबेगाव च्या ग्रामस्थांनी एक आदर्श उदाहरण सर्वसमोर ठेवत 51,000 निधी दिला त्यातून जमलेल्या निधीतून नूतनीकरण टप्प्या टप्प्यात सुरू आहे, त्याचे काही प्रातिनिधीक फोटो पाठवत आहे. सर्वांचे आभार, विशेषतः बाळू काका गावडे, ज्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रामपंचायतीने मोठा निधी देऊ केला स्वार्थाच्या राजकारणात बरबटलेल्या गावगड्याचे चित्र आपण पाहतोच, पण स्वतःची गरज पूर्ण होताच आपल्या मागासलेल्या आदिवासी बांधवांची मदत करण्यास धावून येण्याची संस्कृती गावडे वाडी ग्रामस्थांनी दाखवून दिली.
आभार
टीम सांगाती
पूरग्रस्तांना मदत करण्याचा उपक्रमातील शेवटचा टप्पा असे ठरवून काल कुरुंदवडच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत गेलो. संकलित केलेल्या निधीतून शाळेसाठी उत्तम quality चे बेंचेस घेण्याचा प्रस्ताव श्री पराडकर सरांनी मांडला. निसर्ग पूजा हौसिंग सोसायटीच्या सभासदांनी आत्मीयतेने जमा केलेला निधी विश्ववसार्हतेने सुपूर्द केला होता, त्यात डॉ पद्मज कुलकर्णी ह्यांनी भर घातली आणि सुमारे 1 लक्ष रुपयांचे बेंचेस विकत घेऊन आम्ही शाळेला देण्यासाठी कुरुंदवाड ला दाखल झालो. शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील वातावरण, तिथल्या शिक्षकांचा उत्साह, chairman पराडकर सरांची धडपड पाहून, पुन्हा काहीतरी मोठया स्वरूपात शाळेला मदत करण्याचा निश्चय केला. गरीब आणि मध्यम वर्गातील कष्टकरी, पण शिक्षणाचे महत्व आणि आपल्या लेकरांची शिक्षणाची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून पै अन पै जमवून निवासी शाळेत पाठवणाऱ्या आई बापांची मुलं इथे शिक्षण घेतात. आणि त्यांना आपल्या पाल्याप्रमाणे जपणाऱ्या कुलकर्णी मॅडम, पराडकर सर , पालकांचा विश्वास सार्थ ठरवतात.
ह्या कार्यक्रमात आवर्जून उल्लेख करावा असे 70 वर्षांचे तरुण सुभाषकाका बाबर, आपले वय, डायबेटिस , काही वर्षांपूर्वी झालेली बायपास सर्जरी ह्या पैकी कशाचाही मुलाहिजा न बाळगता, तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात सर्वात पुढे होते. राष्ट्राचे भविष्य ज्यांच्या हातात आहे,त्या तरुण पिढीच्या शैक्षणिक उपक्रमात त्यांना आवर्जून सहभाग घ्यावासा वाटला ह्या साठी त्यांचे खरंच खूप कौतुक वाटले.कधी पर्यंत कार्यरत राहू शकतो ह्याचे एक उदाहरण त्यांनी सर्वसमोर ठेवलं.
ह्या उपक्रमात सहभागी विजेंद्र, त्यांचे स्नेही अमोल आणि समस्त निसर्गपूजा हौसिंग सोसायटी च्या सभासदांचे
आभार
टीम सांगाती
पूरग्रस्तांना मदत।म्हणून मोठ्या प्रमाणात शिधा आणि सामान सांगली भागात गेले, तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शिधा वाटप होऊन केलेल्या मदतीची नासाडी होत असल्याचे लक्षात येताच आपण सर्वांनी मिळून उर्वरित शिधा पालघर च्या गरजू आदिवासी भागात वाटण्याचा निर्णय घेतला त्या नुसार मोखाडा भागात मुलांना खाऊ आणि आदिवासी बांधवांना शिधा वाटण्यात आला, पुण्याहून सर्व सामान मोखाद्याला पाठवून देऊन ,त्याच्या वितरणाची जबाबदारी श्री भास्कर आणि तुळशीराम दादा ह्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिली आणि त्यांनी ती चोख पणे बजावली. पुण्याहून।काही मित्रांसोबत मोखाद्याला।जाण्याचे नियोजन होते पण वेळेचे गणित जमले नाही.
हा सर्व शिधा आणि मुलांसाठी खाऊ जमवण्याचा उद्यम आणि प्रयत्न करणारे आमचे सहकारी श्री मुकुंदराव मसाळ, श्री सचिन भापकर ,पिसोळी आणि श्री सुमित benkar धायरी ह्यांचे मनःपूर्वक आभार आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देऊन सहकार्य केल्या बद्दल धन्यवाद. सत्पात्री मदत झाली !
मुलांच्या चेहेऱ्यावर असलेले निरागस हास्य आणि लोकांच्या चेहेऱ्यावर असलेले समाधान हीच आमच्या श्रमाची पावती खूप आनंद झाला मुलांना मुलं म्हणत होते की रोज येणार का म्हणे😀😀 म्हटलं हो तुम्ही जर चांगला अभ्यास केला रोज शाळेत आले तर काही दिवस रोज येणार.
आपण समान आणि साहित्य कुठे आणि कसे वाटप केले ह्याचे विवरण खाली दिलेले आहे
1. खाऊ आश्रम शाळा गभालपाडा,कर्मवीर छत्रालय,कन्या छात्रालय-२ लोहारपाडा अंगणवाडीला,लोहारपाडा जिल्हा परिषद शाळा येथे बिस्कीट,फरसाण वाटप केले आहे. खाऊ खेड्यावरती जिल्हा परिष शाळेत पण बिस्कीट ,फरसाण वाटप केला आहे.
2. त्यापैकी काही सामान किराणा माल आपल्या वसतिगृहा करिता दिले आहे. तांदूळ 150किलो,गहू 150 किलो पीठ आटा 50,गोडेतेल-50 साबण,फिनेल,खाऊ- फरसाण- बिस्कीट,दंत पेस्ट,डाळी- 60 किलो.इत्यादी सामान वस्तीगृहतील मुलांकरिता दिले आहे सर. बाकी किराणा सामान कार्यकर्ते नि खेड्यात -पाड्यावर वाटप केले आहे.
3. पोशेरा गावात कपड्यांचे वाटप केले.







