Contact info: +91 9096076446, sangatipune2017@gmail.com

माधुकरी योजनेला

मोखाद्यातील आदिवासी वसतिगृहाच्या मुलांसाठी “माधुकरी योजनेला” पुणेकरांचा उदंड प्रतिसाद . आज भैरवनाथ तरुण मंडळ आणि अशोक काका झवेरी ह्यांच्या प्रयत्नातून मोठया प्रमाणात शिधा संकलन करून “सांगाती”संस्थेला सुपूर्द केले. आज पर्यंत विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंदाजे 1000 किलो धान्य, डाळी आणि कडधान्य जमा झाले. सर्वांचे आभार , सदर जमा झालेला शिधा लवकरच वसतिगृह प्रमुख श्री तुळशीराम ह्यांना सुपूर्त करण्यात येईल. आजच्या ह्या कार्यक्रमात मोलाचा वाटा उचलणार्या श्री अशोक झवेरी,श्री शिवले काका, पवन झवेरी आणि ओंकार सपकाळ ह्यांचे विशेष आभार. सांगती संस्थेच्या सर्व उपक्रमांना सर्व स्तरावरून उत्तम प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची बाब आहे. असेच सहकार्य असू द्यावे आणि सांगाती मार्फत असेच नवनवीन उपक्रम राबवता यावे ही श्री गणेश चरणी प्रार्थना !

Posted in Event