*सांगाती व कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता केंद्रामार्फत पै.शिवाजी गाढवे याची लिग्यामेंट शस्त्रक्रिया यशस्वी*
एप्रिल 2017 पासून महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल मल्लांसाठी निस्वार्थी भावनेने सुरू केलेल्या “सांगाती सामाजिक संस्थे” अंतर्गत चालणाऱ्या कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता केंद्र अंतर्गत नुकतेच अहमदनगर चा तुफानी मल्ल पै.शिवाजी गाढवे याच्या लिग्यामेंट ची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली.
याकामी सांगाती चे डॉक्टर सुजीत निलेगावकर सरांचे नेहमीप्रमाणे बहुमूल्य योगदान लाभले.
सदर शस्त्रक्रियेबद्धल पै.शिवाजी गाढवे याने सांगाती व कुस्ती-मल्लविद्या चे आभार मानले.
*हे कार्य पुढे यशस्वीरित्या चालण्यासाठी आपली मदत महत्वाची*
हा उपक्रम चालवण्यासाठी डॉक्टर सुजीत निलेगावकर सर व कुस्ती-मल्लविद्या जीवाचे रान करत आहोत.आजवर अनेक मल्लांच्या शस्त्रक्रिया झाल्या मात्र या निधीच्या खात्यावर येणारे आर्थिक तरतूद नगण्य आहे.त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने यथाशक्ती खालील खात्यावर आर्थिक मदत दिली तर आपला पैसा एखाद्या गरीब मल्लच्या उपचारासाठी संजीवनी ठरू शकतो.
*”कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता निधी साठी आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे”*
कुस्ती-मल्लविद्या परीवार महाराष्ट्र राज्य व “सांगाती” सामाजिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 26 मार्च 2017 रोजी पुणे येथे “कुस्ती-मल्लविद्या पैलवान सहायता निधी केंद्र” याची स्थापना करण्यात आली.
जखमा,हात पायांना इजा होणे,सतत काही ना काही लागणे हे सर्व कुस्ती खेळताना होत असते.
आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक पैलवान अनेक जखमा अंगावर निभावून नेतात व कालांतराने ती व्याधी वाढते आणि फार मोठी डोकेदुखी बनते.
एखाद्या पैलवानांचा हात अगर पाय किंवा तत्सम अवयव दुखावला तर त्यांच्या घरच्यांना अनेक ठिकाणी आर्थिक तरतुदीसाठी पदर पसरावे लागतात व वेळेत निधी न मिळाल्याने अनेक वेळा वेळेत उपचार होत नाहीत,प्रसंगी फार मोठी दुखापत,अवयव जायबंदी होणे असेही प्रकार घडतात.
पण,इथून पुढे महाराष्ट्रातील कोणत्याही तालमीचा,कोणत्याही राज्याचा पैलवान आर्थिक परिस्थिती नाही म्हणून दुखापत घेऊन घरी बसणार नाही.
कुस्ती मल्लविद्या व सांगाती सामाजिक संस्था व डॉ.दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती खेळताना जर कोणताही मल्ल जखमी झाला तर त्याचा उपचार मोफत करण्यात येणार.
यासाठी काल “कुस्ती-मल्लविद्या मेळाव्यात” डॉक्टर सुजित निलेगावकर सर यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली.
*आपण यात कसे सामील होऊ शकता ?*
महाराष्ट्र किंवा देशातून जे वाचक आपल्या पैलवान बांधवांसाठी निधी देऊ इच्छितात त्यांनी खालील खाते नम्बर वर निधी पाठवावा.
आपण दिलेला पै न पै कुस्तीमध्ये जखमी होणाऱ्या मल्लांसाठी वापरला जाईल.
सांगाती सामाजिक संस्था व कुस्ती मल्लविद्या परीवार मार्फत देणगीदार व लाभार्थी मल्ल दोहांची माहिती देणगीदार व मल्लाना देण्यात येणार,सदर जमाखर्चाचे शासकीय ऑडिट मान्यताप्रॉत चार्टड अकौंटंट करतील.
*आपला पैसा एखाद्या मल्लाचे आयुष्य वाचवू शकेल.*
एक महिना हॉटेल जेवण,व्यसनाचे पदार्थ,,सिनेमा,करमणूक इत्यादी मध्ये वाया जाणारा पैसा आपण याकामी द्यावी असे मी नम्र आवाहन करतो.
Sangati
Bank name : IDBI Bank
Branch name : Ganesh Nagar , Pune
Account type : Saving
Account number : 0588104000123044
IFSC code : IBKL0000588
(कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता असा उल्लेख करावा)
वरील खाते नम्बर वर येणारा निधी केवळ पैलवानांसाठी वापरण्यात येईल.
तसेच जे पैलवान उपचार घेऊ इच्छितात त्यांनी कुस्ती-मल्लविद्या शी संपर्क करून आपली समस्यां सांगावी किंवा आपले रिपोर्ट kustimallavidya@gmail.com वर अथवा 9850902575 या व्हाट्सअप्प वर मेल करावेत आपल्याला उपचारात कोणतेही अडचण येणार नाही.
डॉक्टर सुजित निलेगावकर सर यांनी सदर उपक्रमाबाबत दिलेली माहिती खालील लिंक द्वारे video मध्ये पाहावी.
सदर पोस्ट जास्तीत जास्त share करून या निस्वार्थी उपक्रमाला गरजू लोकांपर्यंत पोहचवावे.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या
